Dr. Vinay Kore birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. विनय कोरे, माजी मंत्री, संस्थापक जनसुराज्य पक्ष. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

डॉ. विनयराव विलासराव कोरे हे श्री वारणा औद्योगिक व शैक्षणिक कॉम्प्लेक्‍सचे अध्यक्ष आहेत. ते जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

डॉ. विनयराव विलासराव कोरे हे श्री वारणा औद्योगिक व शैक्षणिक कॉम्प्लेक्‍सचे अध्यक्ष आहेत. ते जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जनसुराज्य पक्षातर्फे त्यांचे चार आमदार निवडून आले होते. 2004 - 2009 मध्ये ते पारंपारिक ऊर्जा व फळबाग मंत्री होते. कोल्हापूर महापालिकेत व जिल्हा परिषदेत ते सत्तेवर होते. पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, करवीर या भागांत त्यांचा प्रभाव आहे. सध्या ते जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. सहकारी कारखाना, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत त्यांची मजबूत ताकद आहे. त्यांचे आजोबा सहकारमहर्षी (कै.) तात्यासाहेब कोरे यांनी 60 वर्षांपूर्वी पहिल्या साखर कारखान्यासह श्री वारणा औद्योगिक व शैक्षणिक संकुल उभारले. वारणा ग्रुपच्या क्षेत्रामध्ये कोरे कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे तेथील ग्रामीण भागातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न प्राप्त झाले. त्यांना फाय फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठने त्यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली आहे.

संबंधित लेख