Dr. Vikhe MLA Jagtap Takes Darshan of Shani | Sarkarnama

मनी आमच्या एकत्रित भाव, देवा आतातरी आघाडीला पाव : डाॅ. विखे, आमदार जगतापांचे शनिदेवाला साकडे

मुरलीधर कराळे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

विरोधी असलेल्या भाजपने यापूर्वीच मोठा गाजावाजा करून प्रचार सुरू केला. त्या तुलनेत आघाडी बॅकफूटवर राहिली, अशी भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. दोन्हीही पक्षांनी मोठा गाजावाजा करून राज्याचे मोठे नेते आणून प्रचार सुरू करावा, अशी अपेक्षाही उमेदवारांनी व्यक्त केली. मात्र विधानसभेतील गडबडीमुळे सर्व नेते व्यस्त असल्याने मोठे नेते मिळू शकले नाहीत, असे एका नेत्यांनी सांगून या विषयावर पडदा टाकला. असे असले, तरी आज राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते एकत्र आले.

नगर : आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. राज्य पातळीवरील नेते नव्हे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीच तो वाढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांनी एकत्रित आज विशाल गणपतीबरोबरच शनिदेवाला नारळ वाढवून विजयाचे साकडे घातले. या वेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते यांनी गणपतीला अभिषेक केला. कोणतेही मोठे नेते न येता थोडा उशिरा झालेल्या प्रारंभामुळे आता शहरात रॅली, सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

विरोधी असलेल्या भाजपने यापूर्वीच मोठा गाजावाजा करून प्रचार सुरू केला. त्या तुलनेत आघाडी बॅकफूटवर राहिली, अशी भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. दोन्हीही पक्षांनी मोठा गाजावाजा करून राज्याचे मोठे नेते आणून प्रचार सुरू करावा, अशी अपेक्षाही उमेदवारांनी व्यक्त केली. मात्र विधानसभेतील गडबडीमुळे सर्व नेते व्यस्त असल्याने मोठे नेते मिळू शकले नाहीत, असे एका नेत्यांनी सांगून या विषयावर पडदा टाकला. असे असले, तरी आज राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अरुण जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर तसेच काँग्रेसचेही शहरातील सर्व पदाधिकारी, उमेदवार आदी उपस्थित होते. माळीवाडा येथील शनीदेवालाही आमदार जगताप व डाॅ. विखे पाटील यांनी एकत्रित नारळ वाढवून साकडे घातले. जोरदार प्रचार करून महापालिकेचे महापौरपद मिळविण्याचा निश्चय केला खरा, पण आता विशाल गणपती कोणाला पावणार, हे काळच ठरविणार आहे.

उमेदवार पळविले तरीही....
केडगाव येथील काँग्रेसचे उमेदवार भाजपने पळविले असले, तरी तेथे काँग्रेसने काही जागांवर पुरस्कृत उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांना डाॅ. सुजय विखे पाटील यांनी ताकद दिली. केडगावमधून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचे नामोनिशान मिटू द्यायचे नाही, असाच प्रयत्न आता काँग्रेस नेत्यांनी सुरू केला आहे. भाजपने ऐनवेळी खेळी केली असली, तरी 'पंजा' ला माणणारी जनता आपल्याच बाजुने राहिल, असा अंदाज काँग्रेसचे नेते बांधत आहेत. त्यामुळे उमेदवार पळविले असले, तरी केडगावमध्ये काँग्रेस मागे हटणार नाही, असा निश्चय काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे.

 

संबंधित लेख