Dr. Tatayaro Lahane warns NCp delegation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

डाॅ. लहाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले , तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ते मी नेते शरद पवार साहेबांना सांगणार 

निखिल सूर्यवंशी 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गरजू, गरिबांसाठी औषधसाठा शिल्लक नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्राहक संरक्षण समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी आरोग्य संचालकाना घेराव घातला .

धुळे : हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गरजू, गरिबांसाठी औषधसाठा शिल्लक नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्राहक संरक्षण समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी आरोग्य संचालकाना घेराव घातला . तेंव्हा   'आमच्या हातात काही नाही .   हा प्रश्‍न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 'हाफकिन'चे मंत्री गिरीश बापट यांच्याकडे जा, मी काही करू शकत नाही. मात्र   तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय मी  नेते शरद पवार साहेबांना सांगणार   ,' असा इशारा  आरोग्य संचालक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिला. 

 

अटल आरोग्य महाशिबिरांतर्गत शस्त्रक्रियांसाठी लहाने हे शनिवारी उपस्थित झाले. तेव्हा त्यांचे 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विविध समस्यांसह औषध टंचाईकडे लक्ष वेधले. काही महिन्यांपासून बाहेरून औषधी आणावी लागतात. एकीकडे भाजप सरकार एका आरोग्य महाशिबिराव्दारे 15 ते 20 कोटींवर निधी खर्च करते. दुसरीकडे धुळे जिल्हा रुग्णालयात औषधीच नाहीत. ही थट्टा असल्याची खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली . 

 त्यावेळी डॉ. लहाने म्हणाले,"  एकाच धुळे येथील नव्हे तर राज्यातील 17 रुग्णालयांमध्ये औषध टंचाई आहे. औषधसाठा पुरविणाऱ्या 'हाफकिन'कडे वर्षभरापासून कोट्यवधींचा निधी भरला आहे. तरीही संबंधित औषधसाठा उपलब्ध झालेला नाही. 'हाफकिन'ला 70 स्मरणपत्रे दिली आहेत. त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यात आरोग्य संचालक विभाग काहीच करू शकत नाही. 'हाफकिन'ने औषधसाठ्याचा पुरवठा करावा, हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे औषध टंचाईचा प्रश्‍न सोडवायचाच असेल तर 'राष्ट्रवादी'च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, मंत्री बापट यांच्याकडे जावे. अटल आरोग्य महाशिबिरासाठी होणारा खर्च व औषधांची टंचाई हे वेगवेगळे प्रश्‍न आहेत. यात राजकारण करणार असाल तर बोलणार नाही. अन्यथा, नेते शरद पवार यांना तुमच्या विषयी माहिती देईल,' असेही डॉ. लहाने यांनी "राष्ट्रवादी'च्या शिष्टमंडळाला सुनावले. तशी 'व्हीडीओ क्‍लिप' शिष्टमंडळाने व्हायरल केली आहे.

याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर- जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, ग्राहक समितीचे शहराध्यक्ष कुंदन पवार, नगरसेवक संदीप पाटोळे, जितेंद्र जगताप, राज कोळी, कल्पेश गर्दे, आशीष देशमुख, एजाज शेख, आकाश बागूल, मयूर सोनार, जयेश शर्मा, रोहन जगताप आदींच्या शिष्टमंडळाने डाॅ. लहाने यांना घेराव घातला. 

हिरे महाविद्यालयाशीनिगडीत जिल्हा रुग्णालयात औषधांची सर्वांत मोठी समस्या आहे. तीन ते चार महिन्यांपासून केवळ अत्यावश्‍यक औषध रुग्णालय प्रशासन उपलब्ध करून देत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या "हाफकिन'कडे येथील रुग्णालयाने एक कोटींचा निधी भरणा केला. तरीही औषधांचा पुरवठा झालेला नाही, अशी तक्रार शिष्टमंडळाने केली.

 रुग्णालयात रूग्णांसह नातेवाइकांना औषधांची कमतरता भासली तर त्यांना रुग्णालयापासून पाच ते सात किलोमीटर धुळे शहरात यावे लागते. तोपर्यंत दाखल रुग्ण दगावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. रुग्णालयात न्यूरॉलॉजी सेंटरमध्ये न्यूरो सर्जन व फिजिशियन डॉक्‍टर नाहीत. एमआरआय मशिन नाही. त्यासाठी रुग्णास शहरातील खासगी एमआरआय करण्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तेथील अतिदक्षता विभागही अद्ययावत नाही. कर्मचारी संख्या कमी आहे. ती तातडीने भरून काढावी. सोयी सुविधांबाबत तक्रारींचा निपटारा व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाने डॉ. लहाने यांच्याकडे केली. 

संबंधित लेख