dr sultan paradhan felicieted by sharad pawar | Sarkarnama

पवार यांचा कॅन्सर बरा करणाऱ्या डाॅ. प्रधान यांना पवारांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

पुणे ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कर्करोग बरा करणारे मुंबई येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाचे प्रख्यात आॅन्कोलाॅजिस्ट सुलतान ए. प्रधान यांचा धन्वंतरी पुरस्कार देऊन पवार यांच्याच हस्ते सन्मानित करण्यात आले. 

पवार यांना २००४ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. अतिशय जिद्दीने पवार या आजारातून बाहेर पडले आणि अनेक रुग्णांसाठी ते रोल माॅडेल ठरले. त्यांच्या या आजारात डाॅ. प्रधान यांनी कौशल्याने शस्त्रक्रिया केल्या होत्या.
 
हा पुरस्कार मिळाल्याने पवार यांनी डाॅ. प्रधान यांच्याबद्दल पुन्हा कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. ते माझ्यासह अनेक रुग्णांचे जीवरक्षक आहेत, अशा शब्दांत त्यांनी प्रधान यांचा गौरव केला आहे. बोलण्यात सौम्य असलेले, मनाने उदार आणि अंतःकरणात करुणा असलेल्या समर्पित व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक आहेत, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. 

डोके व मान यांवरील कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसाठी डाॅ. प्रधान यांचा जगभरात लौकीक आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेमुळे हजारो दुःखी चेहरे हसू लागले आहेत. त्यांनी साध्या एका हाॅस्पिटलचे रुपांतर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केले. हे हाॅस्पिटल म्हणजे  नवीन डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठीचे आशास्थान ठरले आहे. दर वर्षी 40000 रुग्ण या रुग्णालयात येतात. त्यातील 2500 शस्त्रक्रिया डाॅक्टर त्यांच्या टिमच्या मदतीने पूर्ण करतात, अशीही माहिती पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

संबंधित लेख