dr sudhir dhone | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अशोक चव्हाणांनी "कमळा'वर फवारले तणनाशक : डॉ. सुधीर ढोणे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मतदारांनी भाजपला नाकारत मतदानानेच प्रतीउत्तर दिल्याचे डॉ. सुधीर ढोणे म्हणाले. नांदेड महापालिकेचा निकाल पाहता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उतरत्या काळाची ही सुरूवात असल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांनी सांगितले. 
 

अकोला : सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन' च्या भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुक प्रचारातही जनतेला खोटी स्वप्न दाखविली. मात्र, गेल्या तीन वर्षांतील सत्ताधारी भाजपचा कारभार आणि जनविरोधी धोरणांमुळे वैतागलेल्या मतदारांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुन्हा ही महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात दिली आहे. या निवडणूकीच्या निमित्याने अशोकरावांनी कमळावर तणनाशक फवारले असून भाजपची आता उतरती कळा सुरू झाल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली. 

ढोणे म्हणाले, " संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीच्या निमित्याने केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजपने नांदेडची महापालिकाही आपल्याच ताब्यात घेण्यासाठी त्यांचे सर्व "चुनावी जुमले' वापरले. मात्र, गेल्या तीन वर्षांतील केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा अनुभव पाहता नांदेडकरांनी भाजपच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास ठेवला नाही. वाढलेली महागाई, शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी, नोटबंदीचा निर्णयामुळे शेतकरी, मजुर, कामगार, व्यापारी, उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात या सरकारबद्दल तीव्र संताप आहे.'' 

सरकारविरोधातील हा संताप या निवडणुकीच्या निमित्याने मतदारांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टिका केली. मात्र, विकासाची दुरदृष्टी असलेल्या राज्याच्या एका कर्तृत्वान नेत्याबद्दल इतक्‍या खालच्या पातळीवर होत असलेल्या टिकेला मतदारांनी भाजपला नाकारत मतदानानेच प्रतीउत्तर दिल्याचे डॉ. सुधीर ढोणे म्हणाले. नांदेड महापालिकेचा निकाल पाहता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उतरत्या काळाची ही सुरूवात असल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख