dr. rahul aher mla birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड- देवळा (नाशिक) 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

दुष्काळी तालुका असलेल्या चांदवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार झाल्यानंतर चार वर्षात त्यांनी रस्ते व जलसंधारणाच्या कामांत स्वतः श्रमदान करून एक पाणी चळवळ उभी केली. माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे ते चिरंजीव आहेत. पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये एम.एस. (ऑर्थो) पदवी घेतली. 2002 मध्ये शहरात आहेर नर्सिंग होम सुरू केले. 2005 मध्ये शताब्दी रुग्णालय सुरू केले. 2012 मध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन राजदेरवाडीला प्रथम, रेडगावला द्वितीय आणि माणसाने गावाला तृतीय पारितोषिक मिळाले.

दुष्काळी तालुका असलेल्या चांदवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार झाल्यानंतर चार वर्षात त्यांनी रस्ते व जलसंधारणाच्या कामांत स्वतः श्रमदान करून एक पाणी चळवळ उभी केली. माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे ते चिरंजीव आहेत. पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये एम.एस. (ऑर्थो) पदवी घेतली. 2002 मध्ये शहरात आहेर नर्सिंग होम सुरू केले. 2005 मध्ये शताब्दी रुग्णालय सुरू केले. 2012 मध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन राजदेरवाडीला प्रथम, रेडगावला द्वितीय आणि माणसाने गावाला तृतीय पारितोषिक मिळाले. बंद पडलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सुरू केला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न त्यांनी केले. 

संबंधित लेख