dr prachee patil about satara loksabha | Sarkarnama

साताऱ्यातील राजेशाही जाणार, आंबेडकरांची लोकशाही येणार!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

राजेंचं राजेपण तिथे वाड्याबाहेर आलेच नाही.

पुणे :  या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील राजेशाही संपणार असून तिथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही येणार आहे, असे प्रतिपादन सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी केले.

साताऱ्यातील उमेदवार नरेंद्र पाटील आणि ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत आयोजित सभेत त्या बोलत होत्या. 

'भावी खासदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील' असा उल्लेख करून प्राची पाटील म्हणाल्या, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेप्रमाणे सगळीकडे लोकशाही आहे, मात्र साताऱ्यात राजेशाही आहे. मात्र या लोसकभा निवडणुकीत साताऱ्यातील राजेशाही संपुष्टात येवून लोकशाही साकारेल. नरेंद्र पाटील हे धडाडीचे माथाडी नेते आहेत. विधान परिषद आमदार असताना त्यांनी सातारा जिल्ह्यात विकासकामे केली. राजेंचं राजेपण तिथे वाड्याबाहेर आलेच नाही. तिथे नरेंद्र पाटील यांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व उभं केलं आहे. महिलांच्या डोक्यावरचा हंडा काढून साताऱ्याचा सर्वांगिण विकास करणं हे त्यांचं ध्येय आहे. तिथे परिवर्तन होणारच आहे.

संबंधित लेख