dr. pankaj bhoyar mla vardha | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. पंकज भोयर - आमदार - भाजप (वर्धा)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जानेवारी 2019

वर्धा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले नाव असलेल्या डॉ. पंकज भोयर यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमधून सुरू झाली. महाविद्यालयीन जीवनापासून ते राजकारणात सक्रिय झाले होते. वर्धा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्षही ते राहिले होते. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निष्ठावंतापैकी भोयर आहेत. दत्ता मेघे यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केल्यानंतर डॉ.पंकज भोयर यांनीही भाजपची वाट धरून पुन्हा निष्ठा दाखविली. याचे फळ त्यांना लगेच विधानसभा निवडणुकीत मिळाले. वर्धा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. या मतदारसंघातून ते निवडून आले. जिल्ह्यातील एक युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 

संबंधित लेख