dr. nitin raut birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. नितीन राऊत, माजी आमदार. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

उत्तर नागपुरातून सामाजिक कार्यास सुरवात केलेल्या नितीन राऊत यांनी "संकल्प' संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. दसऱ्याला दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला. उत्तर नागपूर मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचा गड मानला जात होता. या मतदारसंघात कॉंग्रेसला यश मिळत नव्हते. कॉंग्रेसशी जुळलेल्या राऊत यांना 1999 मध्ये कॉंग्रेसने उमेदवारी दिली. यात यश मिळाल्यानंतर तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले.

उत्तर नागपुरातून सामाजिक कार्यास सुरवात केलेल्या नितीन राऊत यांनी "संकल्प' संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. दसऱ्याला दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला. उत्तर नागपूर मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचा गड मानला जात होता. या मतदारसंघात कॉंग्रेसला यश मिळत नव्हते. कॉंग्रेसशी जुळलेल्या राऊत यांना 1999 मध्ये कॉंग्रेसने उमेदवारी दिली. यात यश मिळाल्यानंतर तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये त्यांना मानाचे पद मिळाले. अ. भा. कॉंग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

संबंधित लेख