dr. neelam gore birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार व शिवसेना नेत्या 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

डॉ. नीलम गोऱ्हे ह्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विधान परिषदेत त्या
शिवसेनेच्या सदस्य आहेत. 1998 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
उपस्थित त्यांनी 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2002 पासून त्या आमदार तसेच
प्रवक्‍त्याही आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्या विश्वासू नेत्या असून
त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी आहे. स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनांच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. पंचायत राज, महिला सक्षमीकरण, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्या नेहमीच लढत आल्या. महिला कथा आणि व्यथा त्यांनी

विधिमंडळात नेहमीच मांडल्या. राजकीय नेत्याबरोबरच त्या एक लेखिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. "शिवसेनेतील माझी 20 वर्षे' हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले आहे.
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय समितीतर्फे विधानपरिषदेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालेला आहे. 
 
संबंधित लेख