Dr. Jitendra Awhad birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, कळवा-मुंब्रा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची 'एक संर्घषी' नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. 

ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची 'एक संर्घषी' नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. 

कळवा-मुंब्रा या आगरी आणि मुस्लीम समाजबहुल मतदार संघातून ते सलग तीसऱ्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील दहिहंडीचा उत्सव जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी ठाण्यात भव्य दहिहंड्यांचा उत्सव आयोजित करून दहिहंडीला ग्लॅमर मिळवून देण्यात आव्हाड यांचा मोठा हात आहे. 

चळवळी आणि तितकाच वादग्रस्त अशी त्यांची ओळख असून त्यांच्या वक्तव्यावरून होणाऱ्या वादाची ओळख सर्वत्र आहे. जितेंद्र आव्हाड यांचा जन्म 5 ऑगस्ट 1963 साली नाशिक येथे झाला. ठाण्यात शिक्षण घेतलेल्या आव्हाड यांचे शिक्षण बी.ए. एम.एल.एस (मास्टर ऑफ लेबर स्टडीज मुंबई असून त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट ही मिळाली आहे. 

युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. 2002 साली ते कळवा-मुंब्रा येथून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग तीन टर्म या भागाचे नेतृत्व करत आहेत. संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये ते कार्यरत आहेत. तर कै. लिलावती सतीश आव्हाड एज्यु. सोसायटी माध्यमातून शैक्षिणक उपक्रम राबवत आहेत. तर मुस्लीम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहेत. 

वंजारी युवा संघ, जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन, योगा असोसिएशन, कास्ट्राईब महाराष्ट्र जीव प्राधिकरण कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगरा संघटना, बेस बॉल असोसिएशन, विमान वाहतुक क्षेत्रातील पायलट्स गिल्ड या कर्मचारी संघटना अशा संघटनाचे ते अध्यक्ष, सल्लागार या पदावर कार्यरत आहेत.

संबंधित लेख