dr jayashree katare appointed as Pune RDC | Sarkarnama

डॉ. जयश्री कटारे यांनी मारली बाजी : पुण्याच्या पहिल्या महिला निवासी उपजिल्हाधिकारी 

उमेश घोंगडे
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुणे : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक व्हावी, अशी अनेक प्रशासकीय आधिकाऱ्यांची इच्छा होती. अनेकांनी त्यासाठी एनकेन प्रकारे प्रयत्नही केले. मात्र, डॉ. जयश्री कटारे यांची नेमणूक झाल्याने त्यांनी बाजी मारल्याची चर्चा जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात आहे.

कटारे यांना स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचीदेखील फारशी अनूकुलता नव्हती, असे बोलले जात आहे. तरीही जयश्री कटारे यांची नेमणूक झाली असून आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी त्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कटारे यांच्या रूपाने पुण्याला पहिल्या महिला निवासी उपजिल्हाधिकारी लाभणार आहेत. 

सक्षम प्रशासकीय आधिकारी अशी कटारे यांची ओळख असून यापूर्वी बरीच वर्षे पुण्यात काम केल्याने त्यांचा पुण्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत कार्यरत आहेत. "एमबीबीएस' केलेल्या डॉ. कटारे यांची राज्य प्रशासकीय सेवेत 2000 साली उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात त्यातही पुण्यात नियुक्ती व्हावी, अशी प्रत्येक आधिकाऱ्याची इच्छा असते. गेली सुमारे तीन महिने पुण्याची जागा रिक्त होती. या जागेवर अनेक आधिकाऱ्यांनी दावा सांगत आपल्या परीने प्रयत्न केले होते. मात्र यातील कुणाचीही डाळ शिजली नाही.

सत्ताधारी पक्षातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या जागेवर विशिष्ट माणूस आला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. मात्र महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी कुणाचीच डाळ शिजू दिली नाही, असे सांगितले जात आहे. बऱ्याच आधिकाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने ही नावे मागे पडत गेली.
 
संबंधित लेख