dr hedgaonkar nagpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राष्ट्रपती देणार डॉ. हेडगेवारांच्या समाधीला भेट?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 24 सप्टेंबरला नागपूरला भेट देण्याची शक्‍यता असून यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करणार असल्याचे समजते. 

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 24 सप्टेंबरला नागपूरला भेट देण्याची शक्‍यता असून यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करणार असल्याचे समजते. 

रेशीमबाग परिसरातच ज्येष्ठ कवी व गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतीनिमित्त महापालिकेने सभागृह बांधले आहे. या सभागृहाचे उद्‌घाटन येत्या 24 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी महापालिकेतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची नुकतीच भेट घेतली. राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची संमती दिल्याचे समजते. हा नागपूर दौरा राष्ट्रपतींनी केल्यास त्यांचा महाराष्ट्राचा पहिला दौरा ठरणार आहे. 

सुरेश भट सभागृहाला लागूनच रेशीमबाग परिसर आहे. येथे रा. स्व. संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांची समाधी आहे. या समाधीपर्यंत येऊन राष्ट्रपती डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे समजते. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन करणारे कोविंद हे पहिले राष्ट्रपती ठरतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नागपूर कार्यक्रमाबद्दल अधिकृत दुजोरा जिल्हा प्रशासनाने दिलेला नाही परंतु महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याला लवकरच अंतिम स्वरुप मिळेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. 
 

संबंधित लेख