दौंड तालुका कॉंग्रेसमध्ये नव्या पदावरून वादंग

दौंड तालुका कॉंग्रेसमध्ये नव्या पदावरून वादंग

यवत : दौंड तालुका कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एका निष्क्रीय कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या घटनेत नसलेल्या पदावर नियुक्ती दिली आहे. असे कारण सांगत चिडलेल्या दौंड तालुका कॉंग्रेचे अध्यक्ष पोपट ताकवणे यांनी कार्यकर्त्यांसह राजीनामा देण्याचा इशार जिल्हा संघटनेला दिला आहे. त्यामुळे आधिच कमकुवत असलेल्या दौंड तालुका कॉग्रेस मध्ये सुरू असलेली धुसफुस तालुक्यात चेर्चेचा विषय झाला आहे. 

लोणावळा येथे (दि.1 रोजी) झालेल्या कार्यकर्ते प्रशिक्षण शिबीरात भांडगाव (ता. दौंड़) येथील विठ्ठल दोरगे यांची 'दौंड विधानसभा क्षेत्र 199 अध्यक्ष'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद पक्ष संघटनेच्या घटनेला अनुसरून नसल्याचे तालुका अध्यक्ष पोपट ताकवणे यांचे म्हणने आहे. त्याच बरोबर विठ्ठल दोरगे यांचे नाव सुचवणारे पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे समन्वय अशोक फरगडे यांनी सात वेळा कॉंग्रेस पक्ष सोडलेला आहे. या दोघांच्याही पाठीशी कॉंग्रेसचे जनमत नसुन त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून तालुक्यात ओळखले जाते. यांच्यामुळे तालुका कॉग्रेस मजबूत होण्या ऐवजी ती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधली जाईल असा आरोप ताकवणे केला आहे.

विठ्ठल दोरगेंसारख्या नाकर्त्या कार्यकर्त्याला पद देणे हे तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची चेष्ठा केल्या सारखे होईल. याचा विचार जिल्हा कॉग्रेसने न केल्यास आंम्ही तालुक्यातील शंभर निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देऊ असा इशारा पोपट ताकवणे यांनी जिल्हा कॉग्रेसला दिलेल्या पत्रात दिला आहे.

याबाबत कॉग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्हा कमिटीकडे पत्र आलेले आहे. जिल्हा कमिटीच्या बैठकीत त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

विद्यामान तालुकाध्यक्षांच्या पदाला चिटकून राहण्याच्या मनोवृत्तीमुळे मी एकदाच क़ॉग्रेस सोडली आहे. सातवेळा नव्हे. हर्षवर्धन पाटील, संजय जगताप यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे मी पुन्हा कॉग्रेसमध्ये आलो आहे. पदाला चिटकून बसलेल्या तालुकाध्यक्षांनी इतरांना संधी देण्याचा विचार केला पाहीजे. ते तर दुरूच राहिले हे इतर पदावरही कोणाला घेण्यास तयार नाहीत मग तालुक्यात पक्ष वाढणार कसा, असा सवाल पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे समन्वयक अशोक फरग़डे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com