dont teach me politics : Thakrey | Sarkarnama

मला राजकारण शिकविण्याच्या फंदात पडू नका : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : मला राजकारण शिकविण्याच्या फंदात कोणी पडू नये, अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी भाषणच्या सुरवातीलाच हिंदू कार्ड ओपन केले. देशाच्या पत्रिकेत शनि व मंगळ हे वक्री बसले आहेत, असा टोमणा त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

ठाकरे यांनी नेहमीच्या पद्धतीने शिवसैनिकांचे कौतुक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देशातील हिंदूचे रक्षण झाले. मर्द शिवसैनिकांमुळे हे शक्य झाले. तीच परंपरा मी आता पुढे घेऊन चाललो आहे. रावणवधाचा सोहळा दरवर्षी होतो. पण राम मंदिर काही उभे राहत नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

शिवसेना सत्तेतून कधी बाहेर पडणार, असा सवाल करणाऱ्यांना त्यांनी चोख उत्तर दिले. या सरकारचा कारभार कौतुक करण्यासारखा नाही.  संघाचे सहकार्यवाह यांनी देखील सध्याच्या सरकारवर टीका केली.  या सरकारला कानपिचक्या दिल्या. शिवसेनेला कान टोचणे जमत नाही. शिवसेना थेट कानाखाली आवाज काढते. तसा आवाज या सरकारच्या विरोधात शिवसेना काढते आहे. संघाचे पदाधिकारी देखील सरकारवर नाराज आहेत. त्यांना तुम्ही विचारता का की सरकारच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना संपविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण तसा तुम्ही प्रयत्न करून बघा, असे आव्हान त्यांनी दिले. सत्तेतून कधी बाहेर पडणार, असा सवाल मला विचारणाऱ्यांनी मला राजकारण शिकवायची गरज नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

संबंधित लेख