dont give resignations : sambhajiraje | Sarkarnama

संभाजीराजे पहिल्यांदाच उदयनराजेंच्या इलाक्‍यात! म्हणाले दचकत आलोय.... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 जुलै 2018

भिलार : मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार आहे. नेतृत्व त्यांनी केले काय आणि मी केले काय? प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. आरक्षण मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा त्यांनी पदावर राहूनच आग्रह धरावा, अशी अपेक्षा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. 

पाचगणी (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) येथील रोटरी क्‍लबच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी येथे प्रथमच आलेल्या संभाजीराजेंनी हळूवारपणे उदयनराजेंच्या जिव्हाळ्याचे संबंध खास शैलीत उलगडले.

राज्यात सातारा आणि कोल्हापूरची गादी एक आहे. या दोन्ही गाद्यांविषयी जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. हाच धागा पकडून संभाजीराजे म्हणाले, "या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच मी पाचगणीत आलो. हा भाग आमच्या उदयनराजेंच्या इलाक्यात आहे. पाचगणी हे सर्वधर्म समभाव जपणारे शहर असल्याने माझे इकडे येण्याने काही अडचण होणार नाही.'' या भागात माझे मित्र कमी होते. पण, आज मला नवीन कुटुंब मिळाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया देत संभाजीराजेंनी यापुढे माझा पहिला "स्टॉप' पाचगणी राहिल, असे स्पष्ट केले. 

वाघ आपल्या जंगलाचा राजा असतो. आज पहिल्यांदाच मी उदयनराजेंच्या इलाक्‍यात आलोय. येण्याआधी मी दचकत होतो. पण, पाचगणी घाटाच्या वर असल्याने थोडासा सावरलो. कारण पाचगणी कॉस्मोपोलिटन शहर आहे, असा बचावात्मक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील आपले प्रेम अधोरेखित केले. 
 
संबंधित लेख