पुणेकरांनो भाजपच्या मूर्खांना निवडून देऊ नका : चेतन तुपेंचा टोला

पुणे महापालिकेकडे२५ कोटी रूपये नाही म्हणून गरिबांच्या योजनांना कात्री लावण्यात आली.विरोधकांना दुजाभाव करत कमी बजेट दिले.पैसे कमी असल्याचे कारण नेहमी पुढे केले. पालिकेकडेपैसे असताना २०० कोटींचे बॉंडघेतले. यामुळेसत्ताधार्‍यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दांत चेतन तुपे यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. या टिेकेला आता भाजप कसे उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.
पुणेकरांनो भाजपच्या मूर्खांना निवडून देऊ नका : चेतन तुपेंचा टोला

पुणे ः भाजपला पुणे महापालिकेचा कारभार कसा करावा, हे कळत नाही. पैसे कमी असल्याचे कारण सांगून विकासकामे ठप्प आहेत. दुसरीकडे ३३७ कोटी रूपयांच्या ठेवी बॅंकेत ठेवण्याचा प्रस्ताव या पदाधिकाऱ्यांनी आणला आहे. अशा कारभारामुळे पुणेकरांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणालाही निवडून देत जाण पण भाजपच्या मूर्खांना नको, असे म्हणण्याची वेळी आली आहे, अशी कडक टीका विरोधी पक्षनेते चेतन चुपे यांनी केली. 

पुणे महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढताना तुपे यांनी आज कठोर शब्द वापरले. पुण्यातील पाणी योजनेसाठी दोनशे कोटी रूपयांचे रोखे काढले. ते पैसे वापरले गेले नाहीत. ते बॅंकेत ठेवले.  या रोख्यांवरील व्याज पालिकेला भरावे लागत आहे. त्यात आता ३३७ कोटी रूपयांच्या ठेवी ठेवण्यासाठीचा प्रस्ताव आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आणला आहे. या कारभाराला काय म्हणावे, असा सवाल त्यांनी केला.

``पुणे शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले हे नगरसेवकांच्या निधीतून कपात करून पीएमपीला १०० कोटी रूपयांची देण्याची भाषा करतात. पालिकेकडे पैसे शिल्लक आहेत तर हे ३३७ कोटी रूपये पीएमपीला का दिले जात नाहीत. गोगावले यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना समजत नसेल तर त्यांनी विरोधकांचा सल्ला घ्यावा, असेही तुपे यांनी बजावले.

एकीकडे २५ कोटी रूपये नाही म्हणून गरिबांच्या योजनांना कात्री लावण्यात आली. विरोधकांना दुजाभाव करत कमी बजेट दिले. पैसे कमी असल्याचे कारण नेहमी पुढे केले. पालिकेकडे पैसे असताना २०० कोटींचे बॉंड घेतले. यामुळे सत्ताधार्‍यांच्या बुद्धीची किव येते. सत्ताधारी सुधारण्यास तयार नाही. वारंवार टीका करून आम्हालाच आता लाज वाटत आहे. बजेटला कात्री लावण्याची गरज नसती पडली. सत्ताधार्‍यांनी विकासाचा नवीन फंडा काढला आहे, सावकारी धंदा करताना कर्ज काढून गुंतवणूक केली जात आहे.
 अशा त्यांचा मुर्खपणाला जर ते शाश्वत विकास म्हणत असतील तर  त्यांना काही सांगायची पण लाज वाटत आहे. त्यामुळेच पुणेकरांना आता आवाहन करण्याची वेळ आली आहे. कोणालाही निवडून द्या. पण भाजपच्या मूर्खांना नको, असे तुपे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com