dont by 80 lakhs horse : Pawar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

ऐंशी लाखाचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली बरी : पवार

डाॅ. संदेश शहा
रविवार, 4 मार्च 2018

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केवळ पाच मिनिटांच्या धावत्या इंदापूर भेटीमुळे इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा मिळाली. मात्र यावेळी श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांना " ऐंशी लाखाचा घोडा खरेदी करण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली बरी " असा वस्तुनिष्ठ सल्ला दिल्यामुळे कार्यकर्त्यांवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली.

शासकिय विश्रामगृहात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांशी श्री. पवार यांनी उसासंदर्भात समयोचित चर्चा करून सर्वांनी दक्ष रहाण्याच्या सुचना देत त्यांना जबाबदाराची जाणीव करून दिली. 

शरद पवार हे नांदेडचा दौरा आटोपून पुण्याला जात असताना ते इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात तीन मार्च रोजी थांबले. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महारुद्र पाटील, जेष्ठ नेते कालिदास देवकर यांच्या हस्ते श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, जेष्ठ नेते किसन जावळे यांच्या हस्ते झाला.

त्यावेळी श्री. पवार यांनी विश्रामगृहात उपस्थित सर्वांशी सुसंवाद साधला. यावेळी गेवराईचे माजी आमदार शिवाजीराव पंडित घोडे खरेदीसाठी इंदापूरला येत होते असे श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असता श्री. पवार यांनी ऐंशी लाखाचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली बरी अशी मिश्कली करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांना पुढील वर्षी ऊसाची लागण जास्त असल्याने शेतक-यांच्या ऊस गाळपाविषयी सर्वांनी योग्य दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. श्री. पवार यांच्या मौलीक सल्ल्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन धडे मिळाले. ईशान्येतील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाबद्दल श्री. पवार यांनी सूचक मौन बाळगले. 

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रेय शेंडे, नगरसेवक अनिकेत वाघ, बाळासाहेब करगळ, देवीदास भोंग, पांडुरंग मारकड, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, जयवंत बानकर, भावेश ओसवाल, उजेर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
संबंधित लेख