Dombibvali NCP Fighting Between Two NCP Workers | Sarkarnama

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच डोंबिवली राष्ट्रवादीच्या आंदोलनात गटबाजीचे प्रदर्शन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

दोन पदाधिका-यांमध्ये बाचाबाची झाल्याने डोंबिवली राष्ट्रवादीमधील  गटबाजी उघड झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत  सत्ताधा-यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला आपआपसातील मतभेद दूर करण्याची गरज असल्याचे  बोलले जात आहे.

डोंबिवली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यान  परिसरात मौनव्रत धारण  करत केंद्र आणि राज्यशासनाच्या फसव्या धोरणांचा  निषेध राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आला. मात्र या  आंदोलनात दोन  पदाधिकारी  एकमेकांना भिडल्याने असल्याने मौनव्रताची  शांतता  भंग झाली. या घटनेचा व्हिडीओ  सोशल मीडियावर वायरल झाला असला तरी पक्षाने गटबाजीचा आरोप फेटाळून लावला आहे. 

           
राज्यात  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सत्ताधा-यांच्या धोरणामुळे स्वातंत्र्य,  लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व  धोक्यात आले असल्याचे सांगत मौनव्रताद्वारे राष्ट्रवादीने गांधीगिरी  पद्धतीने आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी दोन पदाधिका-यांमध्ये बाचाबाची झाल्याने आंदोलनातील गटबाजी उघड झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत  सत्ताधा-यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला आपआपसातील मतभेद दूर करण्याची गरज असल्याचे  बोलले जात आहे.

एका पदाधिका-याचा धक्का चुकून दुस-याला लागला त्यामुळे थोडा वाद उदभवला. अशी घटना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी घडायला नको होती. मात्र, आमच्यात गटबाजी नाही. 
- रमेश हनुमंते, कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

संबंधित लेख