मंत्रालयाचे 'ते' दालनच  मंत्र्यांसाठी अपशकुनी !

सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन तेथे बसणाऱ्या मंत्र्यांसाठीपुन्हा अपशकुनी ठरल्याची चर्चा राजकीय नेते आणि ब्युरोक्रसीतआहे.
Fundkar-&-Mantralay.
Fundkar-&-Mantralay.

मुंबई  : भाजपचे जेष्ठ नेते आणि कृषिमंत्री भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मित  निधनाने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन तेथे बसणाऱ्या मंत्र्यांसाठी  पुन्हा अपशकुनी ठरल्याची चर्चा राजकीय नेते आणि ब्युरोक्रसीत  आहे.  सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालना शेजारीच  हे दालन आहे. 

राज्यात 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यात आले. हीच परंपरा नंतर काँग्रेस आघाडीची सत्ता असेपर्यंत कायम राहिली. काँग्रेस आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद होते. 

उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांच्यानंतर आर.  आर.  पाटील यांच्याकडे हे पद होते.  भुजबळ यांना आघाडीच्या पहिल्या टर्ममध्ये राजीनामा द्यावा लागला होता . 

तर दुसऱ्या टर्ममध्ये झालेल्या आरोपांची  साडेसाती आजही कायम आहे. आर.  आर . पाटील उपमुख्यमंत्री असताना मुंबईवर दहशतवादी झाल्यानंतर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

नंतर हे पद आणि दालन अजित पवार यांच्याकडे आले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांनीही काही काळ उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

2014 साली राज्यात सत्तांतर झाल्यावर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानावर एकनाथ खडसे होते आणि त्यांच्या वाट्याला हे दालन आले. भोसरी जमीन प्रकरणी खडसेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. 

योगायोगाची बाब म्हणजे हे सर्व नेते सहाव्या मजल्यावर मुख्य इमारतीतील त्या दालनातूनच आपले कार्यालय चालवत होते .

त्यानंतर जेष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर याच दालनातून त्यांचा कार्यभार सुरू झाला. परवा हृदय विकाराने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राज्यातील काही नेते आणि मंत्रालयातील काही अधिकारी  काही वर्षांपासूनच्या या कटू आठवणींवर बोलत असताना ' 'ते'  दालन अपशकुनी असल्याचे म्हणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com