Does Digvijay Singh has connection with Maoists | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

दिग्विजयसिंग यांचे संबंध माओवाद्यांशी?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

'कॉम्रेड प्रकाश'ने 'कॉम्रेड सुरेंद्र' याला 5 सप्टेंबर, 2017 रोजी लिहिलेले पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'विद्यार्थ्यांचा वापर करून देशभरात तीव्र आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे नेते 'सीपीआय(एम)'ला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत', असा उल्लेख त्या पत्रात आहे. यासंदर्भात कॉम्रेड सुरेंद्रला पुढील संपर्क करण्यासाठी एका मोबाईल नंबरचा उल्लेख आहे. हा नंबर दिग्विजयसिंह यांचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.

पुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या पत्रसंवादात दिग्विजयसिंह यांच्या मोबाईल नंबरचाही उल्लेख असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी याबाबत गुप्तता बाळगली आहे. 

या बंदी घातलेल्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. या संदर्भातील आतापर्यंतच्या कारवाईतून दिग्विजयसिंह यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी दिग्विजयसिंह यांचीही चौकशी होण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, तपास सुरू असल्याने पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती उघड करणे टाळले आहे. 

'कॉम्रेड प्रकाश'ने 'कॉम्रेड सुरेंद्र' याला 5 सप्टेंबर, 2017 रोजी लिहिलेले पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'विद्यार्थ्यांचा वापर करून देशभरात तीव्र आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे नेते 'सीपीआय(एम)'ला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत', असा उल्लेख त्या पत्रात आहे. यासंदर्भात कॉम्रेड सुरेंद्रला पुढील संपर्क करण्यासाठी एका मोबाईल नंबरचा उल्लेख आहे. हा नंबर दिग्विजयसिंह यांचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.

पुणे पोलिसांच्या दाव्यानुसार, कॉम्रेड सुरेंद्र म्हणजे नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग हे आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गडलिंग यांना जूनमध्ये अटक केली होती. कॉम्रेड प्रकाश हा सीपीआय(एम)चा वरिष्ठ कमांडर आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्तानुसार, या पत्रामध्ये कोणत्याही काँग्रेस नेत्याचा थेट उल्लेख नाही. पण त्यात उल्लेख असलेला मोबाईल नंबर दिग्विजयसिंह यांचा आहे. 'गरज भासेल, तेव्हा आंदोलनाला सर्व ती मदत करण्याचे आश्‍वासन काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहे', असाही उल्लेख त्या पत्रात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

काँग्रेसने फेटाळले आरोप 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिग्विजयसिंह यांची बाजू घेतली आहे. 'मध्य प्रदेशमधील निवडणुकीसाठी पुणे पोलिस भाजपला मदत करत आहेत का', असा प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केला. 'जिवंत बॉम्ब प्रकरणी (संभाजी) भिडे आणि (जयंत) आठवले यांच्या संस्थांचा सहभाग असल्याचे पुरावे असूनही त्यांची चौकशी मात्र झालेली नाही', असा आरोपही त्यांनी केला. दिग्विजयसिंह यांच्यावर यापूर्वीही माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 3 सप्टेंबर रोजी या प्रकरणी आरोप केले होते. 

संबंधित लेख