Do not fall prey to a petty lie; Mushrif critisizes Ghatege | Sarkarnama

भूल थापांना बळी पडू नका; मुश्रीफांचा घाटगेंना टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मी आमदार होण्यापूर्वी मतदारसंघात गोरगरिबांच्या अनेक समस्या होत्या. आमदारकीच्या काळात गोरगरीबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचा मी प्रयत्न केला. आपण जनतेच्या कल्याणाची अनेक कामे केली. भविष्यातही करत राहणार आहे. मात्र काही लोक आडवे पडत आहेत. त्यांच्या थापांना बळी पडू नका, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता लावला. 

कागल : मी आमदार होण्यापूर्वी मतदारसंघात गोरगरिबांच्या अनेक समस्या होत्या. आमदारकीच्या काळात गोरगरीबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचा मी प्रयत्न केला. आपण जनतेच्या कल्याणाची अनेक कामे केली. भविष्यातही करत राहणार आहे. मात्र काही लोक आडवे पडत आहेत. त्यांच्या थापांना बळी पडू नका, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता लावला. 

कागल येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या कागलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यावरुन जोरदार वाद सुरु आहे. त्यावरही घाटगे यांनी भाष्य केले. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, आम्ही चांगल्याला चांगलेच म्हणतो. कारखाना विक्रमसिंहराजेंचा पुतळा उभारत आहे याचे स्वागतच केले आहे; मात्र पुतळ्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वीस टक्के कपात करणे याचा निषेध केला आणि पैसे कमी पडत असतील तर आम्ही मदत करु असे म्हटले होते. कागल नगरपालिकेमध्ये ठराव करुन राजे विक्रमसिंह घाटगे व खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुतळे उभे करणार आहोत. 

आमच्या सरकारने पिवळी शिधापत्रिका, अन्नसुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, आरोग्य सुविधा आदी अनेक योजना सुरू केल्या. सध्याचे भाजपचे सरकार यातील योजना बंद करत आहे. सत्ता बदल करून या योजना पुन्हा सुरू करूया. गोरगरिबांच्या झोपडपट्टी नियमितीकरणाचे काम केवळ नगरपालिकाच करणार आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

संबंधित लेख