दुष्काळामुळे शरद पवारांच्या वाढदिवशी समारंभ करु नये : दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन 

दुष्काळामुळे शरद पवारांच्या वाढदिवशी समारंभ करु नये : दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन 

मुंबई : राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असून आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही न घेता आपल्या भागातील लोकांना शक्‍य असेल ती मदत करावी असेही पाटील यांनी म्हटले आहे.


लोकसभेचे अधिवेशन सुरु असतानाही शरद पवार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्य 12 डिसेंबर रोजी
रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याचठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा दयाव्यात असेही आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com