dnaneshwra mule said no politics | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

चांगल्या लोकांनी राजकारणात यावे : ज्ञानेश्‍वर मुळे 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

नागपूर : चांगल्या लोकांनी राजकारणात यावे, असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त करून राजकारण प्रवेशाचे संकेत दिले. 

चंद्रपूर येथे डाक कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्राचे उद्‌घाटन मुळे यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ते परराष्ट्र व्यवहार खात्यातील कॉन्सुलर, पासपोर्ट व व्हीस विभागाचे (सीपीव्ही) सचिव आहेत. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सेवानिवृत्तीनंतर मुळे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी सध्या मी सेवेत असल्याचे सांगून यावर स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. 

ते येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. चांगल्या लोकांनी राजकारणात यावे, या मताचा मी असल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या चार वर्षात पासपोर्ट कार्यालयांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगून ते म्हणाले, 2014 मध्ये देशात केवळ 70 पासपोर्ट कार्यालये होती. ही संख्या आता 140 वर गेली आहे.

याशिवाय जिल्हा पातळींवरही पासपोर्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा पातळीवरील डाक कार्यालयांमध्येही आता पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

नीरव मोदी व विजय माल्यांना अटक शक्‍य ? 

नीरव मोदी व विजय माल्ल्यासारखे गुन्हेगार देशातून पळून जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पासपोर्ट विभागाला तात्काळ माहिती दिल्यास यावर आळा बसू शकतो, असेही मुळे यांनी स्पष्ट केले.या दोघांनी हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशात पळून गेले आहे.

याकडे लक्ष वेधले असते ते म्हणाले, जोपर्यंत पासपोर्ट विभागाला केंद्र सरकारकडून सूचना मिळत नाही. तोपर्यंत आम्हाला अशा व्यक्तींबद्दल काहीच माहिती नसते. ही कारवाई प्रामुख्याने सीबीआय, ईडीमार्फत होत असते. अशा व्यक्तींबद्दल पासपोर्ट विभागाला पूर्वसूचना दिल्यास अटक शक्‍य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख