dj ban ganesh boycotted ganpati emersion | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

डेजी बंदीने मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार 

उमेश घोंगडे 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे : डीजेवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि ध्वनिवर्धकाच्या आवाजावर राज्य सरकारने घातलेले निर्बंध यामुळे शहरातील सुमारे सव्वाशे गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी मंडळांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंडळांच्या या पवित्र्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धास्तावले आहेत. यातून काय मार्ग काढण्यासाठी काहींनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे धाव घेतली आहे. 

डीजेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलीच आहे. मात्र राज्य सरकारनेही ध्वनिवर्धकाच्या आवाजावर निर्बंध आणून गणपती मंडळांवर अन्याय केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता गणपती मांडवातच ठेवण्याची भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केली आहे. यातून काहीतरी मार्ग काढण्याची गरज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

गणेशोत्सव मंडळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन राज्य सरकारने बदलण्याची गरज आहे, अशी या मागची खरी भावना आहे. धवनिवर्धकाच्या आवाजावर 55 डेसीबलपर्यंत मर्यादा आणल्यास मिरवणूक काढण्यात कार्य अर्थ आहे, अशी भावना गणपती मंडळाच्या कार्यकर्त्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केली.

उद्या सकाळी मिरवणुकीला सुरवात होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळपासूनच अनेक मंडळे मिरवणुकीच्या रांगेत उभी राहतात. त्यामुळे मंडळांच्या मागणीवर आज रात्रीपर्यंत काहीतरी सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे. 
 
संबंधित लेख