Diwakar Ravte says that salary of ST workers is hiked so much that they are gone mad | Sarkarnama

एवढे पगार वाढले की एसटीचे कर्मचारी वेडे झालेत- दिवाकर रावते

जगदीश पानसरे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

" एसटी कर्मचाऱ्यांचे एवढे पगार वाढलेत की ते वेडे झालेत, " असे वादग्रस्त विधान राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत केले.

औरंगाबादः " एसटी कर्मचाऱ्यांचे एवढे पगार वाढलेत की ते वेडे झालेत, " असे वादग्रस्त विधान राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत केले. महापालिका व एसटीच्या वतीने स्मार्टसिटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहर बस संदर्भात रावते पत्रकारांशी बोलत होते. 

स्मार्टसिटी अंतर्गत औरंगाबाद महापालिकेच्या वतीने शहरात सिटीबस चालवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने परिवहन मंडळाशी 125 बसेसेचा करार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना रावते यांनी या कराराची अधिकृत माहिती दिली. 

गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तेव्हा एसटी महामंडाळाचे कोट्यावंधीचे नुकसान तर झालेच पण नागरिकांचे देखील प्रचंड हाल झाले होते. या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात पत्रकाराने प्रश्‍न विचारताच " तुम्ही कुठल्या सालात जगतात' असा प्रश्‍न करत संताप व्यक्त केला. 

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत असे वादग्रस्त विधान दिवाकर रावते यांनी केले. हे मी अधिकृतपणे बोलतोय हे सांगायला देखील ते विसरले नाही. जास्तीचे काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही अतिरिक्त कामाचे पैसे देखील देतो असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख