Diwakar Raote Unhappy about not putting his banners | Sarkarnama

चांगली कामे केली तरी संघटनांनी फ्लेक्स लावले नाहीत : रावतेंनी व्यक्त केली खंत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

एसटीच्या येथील आगारास मंत्री रावते यांनी भेट दिली. आरटीओ अजित शिंदे, एसटीचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, शिवसेनेचे नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, रामभाऊ रैनाक यांच्यासह  अधिकारी उपस्थित होते.

कऱ्हाड : शहीद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी पास देण्याची योजना सुरु केली. कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी  विविध योजना सुरु केल्या. ही चांगली कामे मी पुढाकार घेवुन केली. मात्र त्याची एकाही एसटीच्या संघटनेने दखल घेवुन त्याचे फ्लेक्स लावले नाहीत, अशी खंत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे व्यक्त केली. 

एसटीच्या येथील आगारास मंत्री रावते यांनी भेट दिली. आरटीओ अजित शिंदे, एसटीचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, शिवसेनेचे नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, रामभाऊ रैनाक यांच्यासह  अधिकारी उपस्थित होते.

त्यादरम्यान एसटीच्या काही संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी आज त्यांच्या प्रश्नासंदर्भात मंत्री रावते यांची भेट घेतली. मंत्री रावते यांनी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. ''संघटनांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुम्ही सुरु केलेल्या योजना चांगल्या असुन त्याचा चांगला उपयोग झाला आहे. पगारासंदर्भातही चांगला निर्णय घेतला आहे. मी जे चांगले आहे ते करतो आहे. मात्र तुम्ही एसटी चांगली चालावी यासाठी प्रयत्न करा, असे सांगुन मी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी पास देण्याची योजना सुरु केली. कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी मी विविध योजना सुरु केल्या. ही चांगली कामे मी पुढाकार घेवुन केली. मात्र त्याचे फलक एकाही संघटनेने लावले नाहीत,'' अशी खंत रावते यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख