diwakar raote about st passes | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार, काळजी करू नका! 

संपत मोरे 
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

अधिकारी कशाला आहेत? त्यांनी अमलबजावणी करायला नको कां ?

पुणे: "दुष्काळी तालुक्यांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार आहेत, काळजी करू नका. काही ठिकाणी पास मिळाले आहेत तर काही ठिकाणी लवकरच मिळतील," असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी केली होती. काही ठिकाणी पास मिळण्यात अडचणी आहेत. काही संघटना पास देण्याची अंमलबजावणी करावी म्हणून अर्ज विनंत्या करत आहेत. 

याबाबत संपर्क साधला असता रावते म्हणाले," दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण तो अधिकाऱ्यांनी राबवला पाहिजे ना ? अधिकारी कशाला आहेत? त्यांनी अमलबजावणी करायला नको कां ? असा सवाल करत त्यांनी सगळ्या विद्यार्थांना मोफत पास मिळतील काळजी करू नका, नवीन पास छापणे सुरु आहे, जसे पास छापून तयार होतील तसे पाठवले जातील, असे सांगितले.   

संबंधित लेख