divakar raote about udayanraje | Sarkarnama

उदयनराजेंना सर्व पक्षांनी बिनविरोध निवडून द्यावे : शिवसेनेची अजब भूमिका

उमेश भांबरे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी जमवून घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही सावज टिपण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी शिवसेनेचे नेते हे छत्रपती उदयनराजेंच्या मदतीला धावून आले आहेत.

सातारा :  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून साताऱ्याच्या खासदाराना सर्वांनी मिळून बिनविरोध निवडून दिले पाहिजे. पण त्यांना बेवारस करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला.

सातारा जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात श्री. रावते बोलत होते. यावेळी शिवसेना कोल्हापूर व  सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, महिला प्रमुख शारदा जाधव, अनिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

रावते म्हणाले, शिवसेनेच्या निष्ठावंत म्हणून काही पदाधिकारी पदाला चिटकून बसले आहेत. त्यांनी आता बदललेल्या परिस्थितीनुसार  नवीन कार्यकर्त्याना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितेल.

ते म्हणाले, शिवसेना लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढणार आहे. मोदींच्या विरोधात शरद पवार यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण यामध्ये  शिवसेनेला सामावून घेणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे.  पण आम्ही त्यांच्या मागे लागलेलो नाही. आम्ही स्वबळावर निवडणूका लढणार आहोत.

यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांचे कौतुक केले. ते म्हणाले,  ``छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या साताऱ्याच्या खासदारांना खरे तर सर्वांनी मिळून बिनविरोध निवडून दिले पाहिजे. पण त्यांच्या ऐवजी शशिकांत शिंदे किंवा विधान परिषदेचे सभापती रामराजे उमेदवार असल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे. शिवरायांच्या वंशजांना बेवारस करण्याचा प्रयत्न सुरू आहे.``

संबंधित लेख