यवतमाळमध्ये भाजप-सेनेत वादाची ठिणगी 

कामगारांना 'बोगस' म्हटल्यावरून कामगारांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे. कामगारांना बोगस म्हणणाऱ्या पक्षाचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी (ता. सात) कामगार सन्मान मोर्चातर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार सन्मान मोर्चा समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असले तरी निमंत्रित सदस्यांमध्ये भाजप पदाधिकारी असल्याने शिवसेना विरोधात भाजप असाच सामना दिसून येत आहे.
यवतमाळमध्ये भाजप-सेनेत वादाची ठिणगी 

यवतमाळ : कामगार नोंदणीवरून सुरू झालेले मित्र पक्षातील राजकारण एकमेकांविरोधात मोर्चा काढण्यापर्यंत पोहोलचलेले आहे. शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सहसंपर्कप्रमुख संतोष ढवळे यांना अटक केल्यानंतर शिवसेनेने पालकमंत्री विरोधात मोर्चा नुकताच काढला होता. त्यानंतर आता कामगारांना 'बोगस' म्हटल्याने कामगार सन्मान मोर्चा समितीतर्फे येत्या मंगळवारी (ता.7) मोर्चा काढण्यात येणार आहे. 

कामगार विभागामार्फत जिल्ह्यात कामगार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतील कामगार नोंदणीवरून यवतमाळ विधानसभेचे सह सपर्कप्रमुख संतोष ढवळे यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी वादविवाद झाला. त्यानंतर ढवळेना अटक करण्यात आली. अटकेने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अटकेवरून पालकमंत्री मदन येरावार यांना लक्ष केले. त्यांच्या विरोधात मोर्चा काढून टिकेची झोड उटविली. शिवाय भाजपतर्फे बोगस कामगार नोंदणी केली जात असल्याचा आरोप केला. 

कामगारांना 'बोगस' म्हटल्यावरून कामगारांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे. कामगारांना बोगस म्हणणाऱ्या पक्षाचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी (ता. सात) कामगार सन्मान मोर्चातर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार सन्मान मोर्चा समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असले तरी निमंत्रित सदस्यांमध्ये भाजप पदाधिकारी असल्याने शिवसेना विरोधात भाजप असाच सामना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षात जिल्ह्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. 
 
समितीतर्फे पाठविण्यात आलेला संदेश
स्वत:चे रक्त आटवून इतरांचे महाल बांधणाऱ्या कामगारांना "बोगस' म्हणणाऱ्या पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी कामगार बांधवांनो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपली ताकद दाखविण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम मजुरांनी बसस्थानक चौक येथे सकाळी दहा वाजता एकत्र यावे, असे आवाहन कामगार सन्मान मोर्चा समितीने केले आहे.

मोर्चाचा मार्ग
यवतमाळ बसस्थानक चौकातून मोर्चा सुरू होऊन दत्त चौक, पालकमंत्री यांचे निवासस्थान, हुतात्मा चौक, तहसील चौक, पाचकंदील चौकानंतर आझाद मैदान येथे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com