dipak sawant, mumbai | Sarkarnama

आरोग्य मंत्र्यांचा सचिवांवर संताप;  मुख्य सचिवांकडे बदलाची मागणी 

तुषार खरात 
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई : आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग विविध कारणास्तव सतत रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत महत्वाचे निर्णय घेता येत नसल्याने आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत संतापले आहेत. त्यांनी मुख्य सचिव सुमीत मलीक यांना थेट फोन करून नवीन सचिव देण्याची मागणी केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी 'सरकारनामा'ला दिली. 

डॉ. सतबीर सिंग सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. गेल्या महिन्यातही ते परदेश दौ-यावर गेले होते. काही काळ खासगी कामासाठी सुद्धा त्यांनी रजा घेतली होती. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून ते कार्यालयातच नाहीत. 

अशातच एका बैठकीच्या निमित्ताने डॉ. सावंत यांचा संताप अनावर झाला. त्याचे झाले असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश हळवणकर, सुजीत मिनचेकर व उल्हास पाटील या तीन आमदारांसोबत मंत्री डॉ. सावंत यांची बैठक सुरू होती. कोल्हापूरातील स्थानिक नगरपालिकेचे इंदिरा गांधी रूग्णालय वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे हस्तांतरीत केले आहे. त्याबाबतचा आदेशही (जीआर) जारी झाला आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या अनुषंगाने डॉ. सावंत यांनी आमदारांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी सचिव व अन्य अधिका-यांनाही निमंत्रित केले होते. सचिव सतबीर सिंग यांच्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नव्हता. नेमके तेच गैरहजर असल्याने डॉ. सावंत यांचा पारा चढला. 

'दीड महिना रजा कशीकाय दिली जाते ?... सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक साथीचे आजार पसरतात. त्यासाठी तातडीने काही निर्णय घेण्यासाठी सचिवांची गरज आहे.' असा संताप व्यक्त करीत त्यांनी मुख्य सचिव सुमीत मलिक यांनाच थेट फोन केला. कोल्हापूरमधील रूग्णालयाचा विषय त्यांच्या कानावर घालत सतबीर सिंग यांच्या अनुपस्थितीविषयी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर माझ्या खात्याला नवीन सचिव द्या अशी मागणीही त्यांनी केली. 
समंजस असलेल्या मलीक यांनी कोल्हापूरची ती फाईल आता स्वत:कडेच मागवून घेतली आहे. 
 
टॅग्स

संबंधित लेख