dipak kesarkar on narayan rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भाजपाने राणेंचा पुर्व इतिहास तपासावा : केसरकर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

केसरकर म्हणाले, यापुर्वी जिल्ह्यात अवैध धंदे, मटका जुगार जोरात सुरु होता मात्र नव्याने आलेल्या पोलीस अधिक्षकांनी जातीनिशी लक्ष घालून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्याकडून चांगले काम सुरू आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): नारायण राणेंचा भाजपा प्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्यांच्या विषयी न बोललेलेच बरे. मात्र त्यांना मंत्रीपद देण्यापूर्वी भाजपाने त्यांचा पूर्व इतिहास तपासावा, असा टोला पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला. 

त्यांच्या प्रवेशाला माझा विरोध नाही, मात्र राणेंच्या प्रवृत्तीच्या विरोधात सुरू असलेली लढाई चालूच राहणार आहे. माझी राजकारणाची पद्धत वेगळी आहे. मी माझ्या तत्त्वात पासू इंचभरसुध्दा ढळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

श्री केसरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राणेंच्या भाजपा प्रवेशा बाबत बोलताना ते म्हणाले, "राणेंच्या प्रवेशाला मी विरोध करणार नाही. त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहीराती आहेत. त्याबाबत आपण कोणतेही वक्तव्य करू इच्छित नाही. लोकांच्या दृष्टीने त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फरक पडत नाही. परंतु त्यांना पक्षात घेताना भाजपाने त्यांची पार्श्वभूमी तपासणी गरजेचे आहे. ज्या व्यक्तीवर अनेक आरोप आहेत अशा व्यक्तीला थेट मंत्रीपद देणे योग्य वाटत नाही. भाजपा राष्ट्रीय आणि तत्त्व मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना घेण्यापुर्वी योग्य तो निर्णय घ्यावा. 

 

संबंधित लेख