dilip yelgaonkar appals udyanraje about ashok sawant | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अशोक सावंतसारखी हलकट माणसे उदयनराजेंनी हाकलून द्यावीत!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

उदयनराजे  स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये या.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीकडून अवहेलना सुरू आहे. स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे जाहीर निमंत्रण भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आज केले.

शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. काल मुंबईतील बैठकीत त्यांच्या नावाची कोणीही शिफारस केली नाही.  

या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर यांना छेडले असता ते म्हणाले, उदयनराजे यांनी हीन वागणूक देणाऱ्या पक्षात थांबू नये. त्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाने पुन्हा भाजप मध्ये यावे. तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आता त्यांनी स्वतःची अवहेलना करून घेऊ नये. अशोक सावंतसारखी हलकट माणसे उदयनराजेंनी हाकलून द्यावीत. कारण त्यांच्याभोवती असलेली हीच माणसे त्यांच्याविषयी चुकीचे वातावरण निर्माण करत आहेत. 
राजघराण्याविषयी आमच्या मनात प्रेम, आदर आहे. त्यांच्यासाठी मी माझ्या आमदारकीवर पाणी सोडले आहे, असेही येळगावकर म्हणाले.

संबंधित लेख