आता नाही कोणतीच लाट....आढळरावांची खासदार म्हणून नाही होणार भेट!

आता नाही कोणतीच लाट....आढळरावांची खासदार म्हणून नाही होणार भेट!

दावडी :  पंधरा वर्षांत खासदारांनी बैलगाडा शर्यत सुरू करू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. विमानतळ घालवले, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला नाही, अशा निष्क्रिय खासदाराला घरी बसवून मला संधी द्या, असे आवाहन शिरूरचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दावडी (ता. खेड) येथे केले.

डॉ. कोल्हे यांचा खेड तालुका गावभेट दौरा शनिवारी झाला. या वेळी ते म्हणाले, ""पदवीधर मुले सुरक्षारक्षकाची नोकरी मागत आहेत. तरुणांच्या हातात दगड दिला जातोय. आज समाजाला दगड उचलणाऱ्यांची नाहीतर दगड रचणाऱ्याची गरज आहे.'' 

माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, ""मोदी लाटेमुळं तिसऱ्यांदा घोडं गंगेत न्हालं, मात्र आता कुठलीही लाट नाही व खासदारांची पुन्हा भेट होणार नाही.''

पाऊस असूनही जल्लोषात स्वागत 
दावडीला प्रचारसभेस पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अमोल कोल्हे यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले व सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. तरुण उत्स्फुर्तपणे त्यांच्याबरोबर सेल्फी काढत होते. 

यावेळी कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, विलास कातोरे, विनायक घुमटकर, सुरेखा मोहिते, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, विजय डोळस, सरपंच वंदना दत्तात्रय सातपुते, दशरथ गाडे, ऍड. तात्या पानसरे, केरभाऊ म्हसाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास बोत्रे, प्रास्ताविक वंदना सातपुते यांनी केले. आभार संतोष गव्हाणे यांनी मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com