मंत्रीपद जाण्याच्या भीतीने दिलीप कांबळेंना शेती करण्याची इच्छा?

मंत्रीपद जाण्याच्या भीतीने दिलीप कांबळेंना शेती करण्याची इच्छा?

पुणे : समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे हे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या विधानांनी जास्त परिचित झालेले आहे. अधुनमधुन ते अशी विधाने करतात की त्यांच्याविषयी चर्चा त्यामुळे घडतेच. मंत्रिपद जाण्याची भीती, भाऊ पुणे पालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्षपद न झाल्याची नाराजी, आगामी निवडणुकीत उमेदवारी न मिळण्याची धास्ती, अशा कारणांमुळे तर दिलीप कांबळे यांनी शेती करण्याची इच्छा व्यक्त केली नाही ना, अशी चर्चा त्यामुळे घडत आहे. 

"भाजपमध्ये 40 वर्षे काम करूनही हां..जी...हां..जी करायची वेळ येते. असं वाटतं हे सोडून शेती करावी,' असं विधान कांबळे यांनी आज (20 मे) पुण्यात बोलताना केलं. खरंतरं कांबळे यांना अशी खंत करण्याची वेळ का आली असावी, याचा शोध आता सुरू झाला आहे. शेती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने योजनाही सुचवाव्यात, असेही कांबळे बोलून गेले.

कांबळे यांना पक्षाने दोनदा मंत्रिपद दिले. पक्ष पहिल्यांदा १९९५ मध्ये शिवसेनेसोबत सत्तेवर आला. तेव्हा त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. काही कालावधीनंतर त्यांच्या काही बाबींवर चर्चा झाल्याने त्यांचे मंत्रिपद गेले. मंत्रिपद गेल्यानंतर 1999 मध्ये त्यांना उमेदवारीही मिळू शकली नाही. त्यानंतर ते फार सक्रिय नव्हते.  2014 मध्ये मोदी लाटेत ते निवडून आले. भाजपही त्यामुळे सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा शपथविधी झाला. त्यांचे एक बंधू सुनील हे पुणे महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक आहेत. आमदार होण्यापूर्वी स्वतः दिलीप कांबळे हे नगरसेवक होते. 

पुणे महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांचे बंधू हे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. पालिकेच्या आर्थिक नाड्या मिळाव्यात आणि पुण्याच्या राजकारणारत महत्त्व मिळावे, अशी कांबळे यांची इच्छा होती. मात्र पहिल्या वर्षी मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्षपद मिळाले. 2018 मध्ये भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. दिलीप कांबळे यांनी भावाला अध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यात यश न आल्याने त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. पक्ष आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना त्यामुळेच त्यांच्यात निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या गटाकडून मानसन्मान मिळत नाही, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे दिलीप कांबळे हे कट्टर समर्थक समजले जातात. खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना थेट "गॉडफादर" राहिला नाही. मंत्रिमंडळ बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले असल्यामुळे कांबळे यांचेही पद त्यामुळे कायम राहिले. मंत्रिपद मिळूनही कांबळे यांना पद टिकविण्यासाठी किंवा भावाला चेअरमनपद मिळवून देण्यासाठी हां...जी हां..जी करण्याची वेळ आली असावी. परिणामी त्यांच्यात शेती करण्याची इच्छा जागृत झाली असेल, असे बोलले जाते. आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यात आपले पद राहणार की जाणार याविषयीही कांबळे यांना धास्ती असावी. त्यांच्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात त्यांच्या विरोधकांनी "दिलीप कांबळे दाखवा, आणि हजार रूपये मिळवा,' असे फलक लावले होते.  

अर्थात कांबळे यांची अनेकदा काही विधाने आक्रमक असतात. अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहारात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम तुरूंगात आहेत. यावर बोलताना आता कदम यांच्या कोठडी शेजारी लवकरच अजित पवार यांनाही बसविणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. पत्रकारांविषयी त्यांनी असेच जाहीरपणे वादग्रस्त विधान केले होते. "पैशासाठी पत्रकार हे काहीही बातम्या देतात,' असे ते बोलले होते. या विधानावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. 

यापेक्षा अधिक धाडसी विधान त्यांनी लातूरमध्ये केले होते. मी ब्राह्मणांसारखा भित्रा नाही. दलीत आहे. वेळ पडल्यास जोड्याने मारेल,' अशा आशयाचे ते बोलले होते. या वाक्‍याबद्दल त्यांना माफीही मागावी लागली होती. या अनेक वाक्‍यांच्या मालिकेत मला शेती करायची आहे, हे विधानही असेच चर्चेत राहणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com