diip todkar and maratha reservation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

रोहनच्या बलिदानाचे सार्थक झाले : वडील दिलीप तोडकर यांचे भावूक उद्‌गार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

चाफळ : मराठा समाजाला शासनाने 16 टक्के आरक्षण दिल्याने रोहनचे बलिदान व्यर्थ गेले नाही, आरक्षण मिळाल्याने त्याचे सार्थकच झाले, असे भावूक उद्‌गार रोहनचे वडील दिलीप तोडकर यांनी काढले. असे सांगताना श्री. तोडकर यांना आश्रु लपवता आले नाहीत. 

मराठा समाजाला आरक्षणाच्या आंदोलनात नवी मुंबई येथे रोहनने सहभाग घेतला होता, काही समाज कंटकांनी घुसखोरी करून रोहनला मारहाण केली होती. मारहाणीत रोहनचा मृत्यू झाला होता. शासनाने मराठा समाजाला आज 16 टक्के आरक्षण दिले. यासंदर्भात रोहन तोडकरचे वडिल दिलीप तोडकर यांचे मनोगत जाणून घेतले. दिलीप तोडकर यांना त्यांच्या भावनांसह आश्रूही आवरता आले नाहीत. 

चाफळ परिसरातील खोणोली दुर्गम खेडेगावातील रोहन नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे राहत होता. तेथे 27 जुलै रोजी मराठा अंदोलन झाले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने रोहनला अमानूष मारहाण केली. त्या मारहाणीत रोहनचा मृत्यू झाला होता. जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार शंभूराज देसाई, विक्रमबाबा पाटणकर, मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वयक शरद काटकर, प्रांत राजेंद्र तांबे, तहसील रामहरी भोसले यांनी उपस्थिती लावली होती. 

श्री. तोडकर म्हणाले, शासनाकडून 25 लाखांची आर्थिक मदत, कुटूंबातील सज्ञान एका व्यक्तीला सरकारी नोकरी असे लेखी आश्वासन दिले होते. त्यातील काहीच पूर्ण झालेले नाही. मात्र मराठा समाजाला शासनाने आज सोळा टक्के आरक्षण दिल्याने रोहनने दिलेल्या बलिदानाचे एक प्रकारे सार्थकच झाले आहे असे आम्ही समजतो. त्यामुळे मला समाधानही वाटते अन्‌ दुखही होत आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षण मिळालेच ऐकताच श्री. तोडकर यांचा अभिमान चेहऱ्यावर दिसत होता. 

संबंधित लेख