digvijaysing and pune police | Sarkarnama

भाजप आणि आरएसएस मला घाबरतात - दिग्विजयसिंह

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे : नक्षलवाद्याशी संबंध असल्याचे सांगून आपल्याला मुद्दाम कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. पुण्याजवळील भीमा कोरेगाव दंगल भडकवण्याचा आरोप असलेले जो लोक पकडले आहेत त्यापैकी सुरेंद्र गडलिंग यांच्या पत्रात दिग्विजयसिंह यांच फोन नंबर पुणे पोलिसांना आढळला असून या प्रकरणात दिग्विजयसिंह यांची चौकशी केली जाणार आहे. आपल्याला भाजप व आरएसएस हे दोघेही घाबरत असल्याचा दावाही दिग्विजयसिंह यांनी केला आहे. 

कुठल्याही चौकशीला सामोरे जायची आपली तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भीमा कोरेगाव दंगलीनंतर पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात या दंगलीत काही नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे काही पुरावे सापडले होते. या पुराव्याच्या आधारे काही लोकांना अटकही करणत आली. या लोकांकडील कादपत्रानुसार माओवादी संघटनेबरोबर दिग्विजयसिंह यांचा संबंध असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आळे असून पोलिस या प्रकड़णाची खोलवर चौकशी सुरू असून दिग्विजयसिंह यांना चौकशी साठी पुणे पोलिसांकडून बोलावले जाण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित लेख