Digvijay singh Ashadh vari | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

दिग्विजयसिंह यांच्या आषाढी वारीचा यंदा रौप्य महोत्सव 

विलास काटे
सोमवार, 3 जुलै 2017

आळंदी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे आपल्या आषाढी पंढरी वारीचा रौप्य महोत्सव यंदा साजरा करीत आहेत. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे आळंदी येथे आज दर्शन घेऊन त्यांनी या रौप्य महोत्सवाचा प्रारंभ केला.
 
"संत ज्ञानेश्वरांच्या चरणाला वंदन करतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना प्रेरणा देत राहावे,'' असा अभिप्राय त्यांनी वहीत नोंदविला. आज दुपारी बाराच्या दरम्यान आळंदीत पोचल्यानंतर माउलींच्या समाधीवर त्यांनी पूजन केले. आषाढी एकादशीच्या मध्यरात्री ते विठ्ठलाचे दर्शन घेतील.

दिग्विजयसिंह यांनी गेल्या 25 वर्षांत पंढरपूरची आषाढी वारी चुकविली नाही. 25 वर्षांपूर्वी त्यांना या पालखी सोहळ्याविषयी काही माहिती नव्हते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी त्यांना वारीबाबत माहिती दिली. त्यानंतर ते जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलले. त्यांनी सोहळा पाहायचा असेल तर आषाढी वारीच्या सोहळ्याला यावे असे सांगितले. त्यावेळी दिग्विजयसिंह मुख्यमंत्री होते. त्यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा आषाढी वारी केली. सर्व जाती धर्माचे हजारो लोक एकत्र येऊन चालतात, हे पाहून ते थक्क झाले होते. वारी हे सर्वधर्मसमभावाचे आदर्श प्रतिक असल्याची त्यांची भावना आहे. त्या भावनेपोटीच त्यांची वारी त्यानंतर कधी चुकलेली नाही.  

संबंधित लेख