digvijay singh | Sarkarnama

दिग्वीजयसिंहांना गोव्यातून डच्चू

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही कॉंग्रेसला सत्तेपर्यंत नेण्यात अप्रत्यक्ष जबाबदार ठरलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोव्याच्या प्रभारीपदावरून हटविण्यात आले आहे. गोव्यासह कर्नाटकचे प्रभारीपदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले 

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी या बदलांची घोषणा केली. दिग्विजय यांच्या जागी गोव्यात पक्षाचे चिटणीस ए. चेल्लाकुमार यांची तर कर्नाटकमध्ये के. सी. वेणुगोपाल यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. गोवा निवडणुकीत कॉंग्रेसने पैकी तर भाजपने जागा जिंकल्या होत्या. दिग्वीजय सिंह नेहमीच वादग्रस्त विधाने करीत असतात. त्यामुळे पक्ष नेहमीच अडचणीत सापडतो. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा कॉंग्रेसवर नामुष्कीची वेळ आली आहे. गोव्यात सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना कॉंग्रेसचे सरकार बनविता आले नाही. उलट नुसतीच टीका आणि ट्विट करून वादाला फोडणीचे देण्याचे काम सिंह करीत राहिले. आता कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित लेख