digital india advertise model want job raj thackray | Sarkarnama

डिजीटल इंडिया जाहीरातीमधील मॉडेलची नोकरीसाठी वणवण : राज ठाकरेंचा गौप्यस्फोट 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापुरात केली. या जाहिरातीमधील मॉडेल म्हणून काम केलेला तरूण आज नोकरीसाठी वणवण फिरतो आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला 

मोदी शहांना राजकीय क्षितीजावरून हद्दपार करा असे आवाहनही राज यांनी सोलापुरातील सभेत केले. मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविताना ते म्हणाले, की 
हरिसाल गावातील या तरूणाला भाजपावाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये. मात्र हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत.

आता हा तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे. तसंच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे . डिजिटल इंडियाच्या या गावातील हा तरूण पुणे, मुंबईत नोकरी शोधत आहे. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव डिजिटल इंडियात देशभर झळकले. या गावात डिजिटल इंडियाचा कसा बोजवार उडाला हे राज यांनी यावेळी दाखवून दिले. 

संबंधित लेख