dighanchi daccouity tip issue | Sarkarnama

पोलिसप्रमुखांनाच टिप मिळाली, त्यानंतर PI कोळींचा फोन दिघंचीच्या सरपंचांना आला!  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

सरपंच मोरे यांनी तातडीने समाजमाध्यमांवरून हा मेसेज पाठवला.

दिघंची (सांगली) : दरोडा पडणार अशी टिप थेट पोलिस प्रमुखांनाच मिळाली. त्यानंतर सूत्रे हलली आणि आटपाडी पोलिसांची वाड्या वस्त्यांवर रात्रभर गस्त सुरु झाली.  

अधिक माहिती अशी : पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांच्याशी रात्री बारा वाजता संपर्क साधला. त्यांनी गावातील नागरिकांनी सावध व्हावे, यासाठी सूचना केल्या. सरपंच मोरे यांनी तातडीने समाजमाध्यमांवरून हा मेसेज पाठवला. लोकांना सावध राहून जागरण करा असे आवाहन केले.

पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कोळी म्हणाले,"" रात्र गस्त वाढवली आहे. नागरिकांनीही पथके नेमून पहारा द्यावा. पोलिसांच्या संपर्कात रहा.'' 

सरपंच अमोल मोरे म्हणाले," आम्ही परिसरात जागता पाहरा ठेवणार आहोत. ग्रामस्थांनी शक्‍यतो रात्री एकटे घराबाहेर पडणे टाळावे. अडचण असल्यास ग्रामपंचायत ककार्यालयाशी संपर्क साधावा. 

संबंधित लेख