DIFFICULT TO GET DHANGAR RESERVATION IN ST : RATHOD | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

धनगर समाजाला `एसटी`चे आरक्षण मिळणे कठीण : राठोड

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देऊ शकत नाही, हे भाजपलाही माहित आहे. तरीदेखील त्यांनी खोटे आश्वासन दिले, असा आरोप काॅंग्रेसचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला.
 

सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देऊ शकत नाही, हे भाजपलाही माहित आहे. तरीदेखील त्यांनी खोटे आश्वासन दिले, असा आरोप काॅंग्रेसचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला.
 
सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. धनगर समाजाच्या व्होट बॅंकेवर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. धनगर आरक्षणाला एसटी म्हणून विरोध करणारा या प्रवर्गाच्या खासदारांचा मोठा गट सक्रिय आहे. धनगर समाजाने ओबीसी आरक्षणात पोट आरक्षण निर्माण करून केंद्रात व राज्यात आरक्षण तसे घ्यावे. त्यातून धनगर समाजाचे वर्षाला बाराशे आयएएस/आयपीएस होतील, असा अंदाजही आमदार राठोड यांनी व्यक्त केला.

एसईबीसी आणि ओबीसी एकच असल्याने व भविष्यात मराठा समाज राजकारणातही आरक्षण मागण्याची शक्यता असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचे नाव बदलावे. मराठा आरक्षणाचे 16 टक्के हे राणे समितीने निश्चित केले आहेत. ही टक्केवारी निश्चित करण्यासाठी ओबीसी आणि मराठा समाजाची जनगणना करूनच आरक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका दिवसात जनगणना करता येईल. जनगणनेच्या तयारीसाठी आठ दिवस पुरेसे आहेत. देशातील सर्वांना आरक्षणाचा लाभ देता येईल. ओबीसी, एससी आणि एसटीसाठी प्रवर्गनिहाय पोट आरक्षण निर्माण करावे. जनगणना न करताच मराठा समाजाला आरक्षण दिल्यास हे आरक्षण टिकणार नाही. टिकाऊ आरक्षण देण्यासाठी जनगणना आवश्यक आहे.``

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वंचित आघाडीने कॉंग्रेससोबत यावे. 1993 मध्ये बहुजन महासंघाने ज्या पध्दतीने राजकीय प्रयोग केला आणि 1995 मध्ये युती सत्तेत आली तशीच स्थिती सध्या दिसत आहे. वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास सोलापूरसह राज्यात कॉंग्रेसचे वांदे होतील आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल, असाही अंदाज राठोड यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख