धैर्यशील माने यांचा शिवसेनेत प्रवेश; हातकणंगलेत राष्ट्रवादीला झटका

धैर्यशील माने यांचा शिवसेनेत प्रवेश; हातकणंगलेत राष्ट्रवादीला झटका

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसला हातकणंगले मतदारसंघात झटका बसला असून माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र धैर्यशील यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील हे आता हातकणंगले मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येथील विद्यमान खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार तसेच घडले. पवार यांच्या भेटीला माने कुटुंबीय गेले नव्हते. तसेच पवार यांनी देखील शेट्टी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता.

माने कुटुंबीय तडजोडीच्या भूमिकेत नसल्याने धैर्यशील यांनी थेट आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. त्यांचा भगवा झेंडा हाती घेतलेला फोटो व्हायरल झाला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com