dhule-sharad-pawar-raj-thackeray | Sarkarnama

शरद पवारांकडून आघाडीचे संकेत; राज ठाकरेंची भाजपवर आगपाखड

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची मैत्री अधिक घट्ट व्हावी आणि त्यातून आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयात उमेदवारांच्या माध्यमातून निवडणुका लढविणाऱ्या भाजपकडे पैसा येतो कुठून, असा प्रश्‍न उपस्थित करत या पक्षाच्या ध्येयधोरणांवर आगपाखड केली. 

धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची मैत्री अधिक घट्ट व्हावी आणि त्यातून आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयात उमेदवारांच्या माध्यमातून निवडणुका लढविणाऱ्या भाजपकडे पैसा येतो कुठून, असा प्रश्‍न उपस्थित करत या पक्षाच्या ध्येयधोरणांवर आगपाखड केली. 

महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी श्री. पवार, तर मनसेच्या खानदेशस्तरीय मेळाव्यासाठी श्री. ठाकरे दौऱ्यावर होते. दोघे नेते एकाच दिवशी उपस्थित असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. 
 
पवार यांची भूमिका 
कॉंग्रेसद्वयींची मैत्री घट्ट व्हावी, असे सांगताना श्री. पवार यांनी आमदार अमरिशभाई पटेल यांनी आता शिरपूरबाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी लक्ष घालावे, त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यवहार आणि विकास ज्यांना कळतो त्यांच्या हातात सत्ता असावी, असेही श्री. पवार म्हणाले. 

ठाकरे यांची टीका 
श्री. ठाकरे म्हणाले, की दुसऱ्या पक्षातील माणस घ्यायची आणि निवडणूक लढविण्याचा उद्योग करणाऱ्या भाजपची स्थिती म्हणजे दुसऱ्याचा मुलगा कडेवर घेऊन फिरायचे, आपला मुलगा नको हा विचार करायचा नाही, अशी आहे. विकासाचा आराखडा नसेल, नागरिकांनी पैशाला हुरळून जायचे, असे समीकरण असेल तर विकासाचा विचारच कुणी करायचा नाही, अशी जाणीव श्री. ठाकरे यांनी करून दिली. कॉंग्रेसने देशात जे केले तेच भाजप करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

संबंधित लेख