dhule-election-complaint-against-fadanvis-danave  | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या विरोधात  आचारसंहिता भंगाबाबत आघाडीची तक्रार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

धुळे महापालिका निवडणूक विविध घडामोडींमुळे गाजते आहे. त्यात वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्‍यता असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळेकर मतदारांना प्रलोभन दाखविणारे वक्तव्य सोशल मीडियावरील "क्‍लिप'व्दारे करीत असल्याची तक्रार निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे आज (शनिवार) दाखल झाली आहे. कॉंग्रेस आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ती केली.

धुळे : धुळे महापालिका निवडणूक विविध घडामोडींमुळे गाजते आहे. त्यात वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्‍यता असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळेकर मतदारांना प्रलोभन दाखविणारे वक्तव्य सोशल मीडियावरील "क्‍लिप'व्दारे करीत असल्याची तक्रार निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे आज (शनिवार) दाखल झाली आहे. कॉंग्रेस आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ती केली. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया हे आज (शनिवारी) दौऱ्यावरही होते. त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अनिल मुंदडा यांनी महापालिका निवडणुकीतील निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे नऊ नोव्हेंबरला धुळे शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आचारसंहिता लागू झालेली असतानाही प्रचार सभेत "धुळे महापालिकेमध्ये भाजपला सत्ता द्या, मी मुख्यमंत्र्यांना तीनशे कोटींचा निधी देण्यास भाग पाडेल', असे प्रलोभनात्मक वक्‍तव्य केले. तसेच "निवडणुकीच्या काळात जो कुणी मार्गात आडवा येईल, त्याच्या मुंडक्‍यावर पाय ठेवून पुढे सत्ता मिळवू', अशा आशयाचे श्री. दानवे यांचे वक्तव्य सामाजिक तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील एक ध्वनिफीत सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यात नाशिक व धुळे महापालिका क्षेत्रात "एमएनजीएल' योजनेंतर्गत घरोघरी स्वच्छ व सुरक्षित गॅस देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले आहे. तो मजकूर महापालिका क्षेत्रातील मतदारांना प्रलोभन दाखविणारा आहे. त्यामुळे ध्वनिफितीची चौकशी करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री. सनेर, श्री. मुंदडा यांनी तक्रारीव्दारे केली आहे.
 

संबंधित लेख