लक्ष्मण ढोबळेंच्या कार्यालयावर घड्याळ जाऊन भाजपचे कमळ अखेर फुलले....

लक्ष्मण ढोबळेंच्या कार्यालयावर घड्याळ जाऊन भाजपचे कमळ अखेर फुलले....

मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मंगळेवढा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे वीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टी असे नामांतर आले.

मोहोळ विधानसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीशी फारकत घेतलेल्या माजी मंत्री ढोबळे यांची पक्षात होत असलेली घुसमट लक्षात येत होती. पक्ष सोडण्याच्या अनेक वावड्या उडाल्या. सोलापूरात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता भाजपचे प्रवेशाचे संकेत मिळाले. पण मुहूर्त सापडत नव्हता. अखेर लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी जाहीर होण्याआधी त्यांनी भाजपत प्रवेश केला.

पक्ष प्रवेशानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोफ डागली. काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर सहभागी होणारे लक्ष्मण ढोबळे हे पहिले मागासवर्गीय नेते होते. अक्कलकोट वासीय ढोबळे यांच्या राजकीय कारकिर्दीला मंगळवेढ्यामध्ये अधिक वाव मिळाला. वीस वर्षे आमदारकी, अन्न व नागरी पुरवठामंत्री, उच्चशिक्षण मंत्री या पदांवर काम करताना त्यांनी ग्रामीण जनतेसाठी मुरलीधर चौकात संपर्क कार्यालय काढले. 

ते मोहोळचे लोकप्रतिनिधी झाल्यावर हे कार्यालयात ओस पडत गेले. कार्यकर्ते आणि ढोबळे यांचा संपर्क कमी झाला. पण भाजप प्रवेशानंतर तालुक्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या परिचारक गटाला व भाजपाला मंगळवेढ्यात मात्र अच्छे दिन येण्याचे संकेत मिळू लागले.

या कार्यालयाचे नाव बदलण्यात आले. त्यामुळे भविष्यात या कार्यालयाला पूर्वीप्रमाणे दिवस येणार असे दिसत आहे. मंत्री ढोबळे यांनी विद्यमान आमदार भालके व कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यावर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून निशाणा साधला. सध्या ढोबळे यांचा मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्या गोटात खेचण्यावर अधिक भर राहण्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com