dharma patil farmer dhule news | Sarkarnama

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धर्मा पाटील यांच्या अस्थिंचे विसर्जनही नाही : नरेंद्र पाटील 

तुषार खरात 
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई ः आपल्या शेतजमिनीसाठी योग्य मोबादला मिळावा म्हणून वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. त्यानंतर राज्य सरकारने शेतीचा मोबदला दिला. पण जमिनीचे योग्य मुल्यांकन न करता हा मोबदला दिला आहे. योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार करीत धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील सरकारी दरबारी खेटे घालत आहेत. 

मंगळवारी नरेंद्र पाटील यांची ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत विधानभवनात बैठक झाली. यावेळी महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते. जमिनीचे योग्य मुल्यांकन व्हावे. आमच्या लगतच्या जमिनींना जो भाव दिला आहे, तोच भाव आम्हाला मिळावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली.

पण बावनकुळे व अधिकारी यांच्यातच जमिनीला भाव कसा द्यायचा याबाबत एकमत नव्हते. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व बावनकुळे यांच्याकडून परस्पर विरोधी माहिती दिली जात होती, अशी नाराजी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची बोळवण मंत्र्यांनी केल्याचे पाटील म्हणाले. 

सरकारने धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यावर 24 लाख रुपये, तर नरेंद्र पाटील यांच्या खात्यावर 23 लाख रुपये परस्पर जमा केले आहेत. या रकमेबाबत 
सरकारने आम्हाला कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. माहितीही दिलेली नाही. पाच एकर जमिनीसाठी दिलेली ही रक्कम फारच कमी आहे. याउलट आमच्या लगतच्या 
पावणेदोन एकर जमिनीसाठी 1 कोटी 89 लाख रुपये दिले आहेत. हा आमच्यावर अन्याय असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले. 

जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत बॅंकेत पाठविलेली रक्कम स्वीकारणार नाही, तसेच धर्मा पाटील यांच्या अस्थिंचे विसर्जनही करणार नाही, असे नरेद्र पाटील म्हणाले.

संबंधित लेख