धर्मा पाटलांना 50 लाखांवर मोबदला : सानुग्रह अनुदानासह धुळे प्रशासनाचा प्राथमिक अहवाल 

भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारे विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी (कै.) धर्मा मंगा पाटील आणि त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना सानुग्रह अनुदानासह वाढीव 50 लाख 44 हजार 687 रुपयांचा मोबदला देय असल्याबाबत प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तथापि, तो अद्याप सरकारला सादर झालेला नाही.
धर्मा पाटलांना 50 लाखांवर मोबदला : सानुग्रह अनुदानासह धुळे प्रशासनाचा प्राथमिक अहवाल 

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारे विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी (कै.) धर्मा मंगा पाटील आणि त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना सानुग्रह अनुदानासह वाढीव 50 लाख 44 हजार 687 रुपयांचा मोबदला देय असल्याबाबत प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तथापि, तो अद्याप सरकारला सादर झालेला नाही. 

धर्मा पाटील यांना शंभर टक्के दिलासा रकमेसह आंब्याच्या 376 रोपांसाठी तीन लाख 41 हजार 402, तर प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानापोटी 24 लाख 64 हजार 582 असा एकूण 28 लाख 5 हजार 984 आणि नरेंद्र धर्मा पाटील यांनाही शंभर टक्के दिलासा रकमेसह आंब्याच्या 272 रोपांसाठी दोन लाख 46 हजार 976, तर प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानापोटी 23 लाख 95 हजार 172, असा एकूण 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो. 

त्यांच्या एकूण आंब्याच्या 648 रोपांसाठी पाच लाख 88 हजार 378 आणि सानुग्रह अनुदान म्हणून एकूण 48 लाख 59 हजार 754, असा एकंदर 54 लाख 48 हजार 132 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो. त्यात पूर्वी त्यांना चार लाख तीन हजार 445 रुपयांचा मोबदला अदा झाला असल्याने तो वगळता नव्याने 50 लाख 44 हजार 687 रुपयांचा मोबदला देता येऊ शकेल, असा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. 

दोंडाईचा- विखरण परिसरात 2009 ला प्रस्तावित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत भूसंपादनातील फळबागेचे योग्य पद्‌धतीने मूल्यांकन नाही, अपेक्षित मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी थेट मंत्रालयात विष प्राशन केले होते, त्यात त्यांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शासन, प्रशासनाचे धाबे दणाणल्यानंतर फेरचौकशीची चक्रे वेगात सुरू झाली. 

देय मोबदल्याची तयारी 
या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात 30 जानेवारीला झालेल्या बैठकीतील निर्णयानंतर विविध प्रकारची माहिती भूसंपादन, कृषी, वन आणि महसूल यंत्रणेने संकलित केली. या प्रकरणी वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीने कागदपत्रांच्या पाहणीनंतर मृत धर्मा पाटील, नरेंद्र पाटील यांच्या शेतात आंब्याची 648 रोपे असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत मूल्यांकनाचा अहवाल मागविला आहे. 

दोन दिवसांपासून जुळवाजुळव
धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर 30 दिवसांत नियमानुसार न्यायदान केले जाईल, असे हमी पत्र ऊर्जामंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना दिल्यानंतर पीडित पाटील कुटुंबाला शासन निर्णय, जमिनीच्या किमतीसह नेमका एकूण किती मोबदला द्यावा लागेल, यासंबंधी आकडेवारीची दोन दिवसांपासून जुळवाजुळव सुरू होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com