dhanora taluka accident | Sarkarnama

आष्टी तालुक्‍यात धानोराजवळील अपघातात 14 ठार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जून 2017

आष्टी (जि बीड) : रस्त्याच्या एका वळणावर कठडा नसल्याने खासगी प्रवासी बस खाली कोसळून झालेल्या अपघातात 14 प्रवासी ठार झाल्याची घटना तालुक्‍यातील धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे रविवारी (ता 11) पहाटे घडली. 
बीड येथील सागर बस या खासगी कंपनीची प्रवासी बस मुंबईहून लातूरकडे जात होती.

पहाटे चार वाजता आष्टी तालुक्‍यातील धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे बस आल्यावर पहिल्याच वळणाला कठडा नसल्याने बस सरळ रोडच्या खाली असलेल्या खड्ड्यात कोसळली. बसने चार पलट्या खाल्या, त्यात नऊ जण जागीच ठार झाले. तर, 15 जण जखमी झाले. गंभीर जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींपैकी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कडा व आष्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. 
 
संबंधित लेख