Dhanjay Munde should Resign : Suresh Dhas | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

नैतिकता असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा : सुरेश धस

सरकारनामा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

अलिकडच्या काळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. दोघेही एकमेकांविरोधात राजकीय आरोप प्रत्यारोपाची संधी सोडत नाहीत. जिल्हा बँक कर्ज प्रकरणी न्यायालय आदेशाच्या निमित्ताने सुरेश धस यांना पुन्हा धनंजय मुंडे यांच्या विरोधात संधी  मिळाली  आहे. 

आष्टी (जि. बीड) :" जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मान राखून थोडीही राजकीय नैतिकता असेल तर संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा, शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनी  धनंजय मुंडेंच्या हातात हातात नारळ द्यावा," अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

धनंजय मुंडे संचालक असलेल्या संत जगमित्र नागा सहकारी सुतगिरीणीकडील कर्ज प्रकरणी सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यासह इतर संचालकांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा नोंदवून खरेदी विक्री व्यवहारास मनाईचे आदेश दिले आहे. त्यावर सुरेश धस यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना वरील मागणी केली.धनंजय मुंडे यांचा ‘खोट बोल पण रेटून बोल’ हा खरा चेहरा समोर आल्याचा टोलाही सुरेश धस यांनी लगावला आहे.

" धनंजय मुंडे नेहमीप्रमाणे खोटे बोलून या प्रकरणाला राजकीय वळण देऊन आपल्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र ठेविदार संरक्षण कायद्यानुसार औरंगाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी विशेष तपास यंञणा (एसआयटी) स्थापन केलेली आहे. यावर अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे नियंत्रण आहे. त्यामुळे बीड पोलीस अधिक्षकांचा काहीही संबंध नसताना विनाकारण त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप धनंजय मुंडे करत आहेत ," सुरेश धस म्हणाले. 

"या सुतगिरणी आणि संचालकांची व्यक्तीगत मालमत्तेवर टाच असल्याचे सांगून सध्याचे आठ संचालक सध्या जात्यात असून बाकीचे सुपात आहेत. उठसुठ राज्यशासनावर आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे धनंजय मुंडे या निमित्ताने तोंडघशी पडले असून ‘जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे’ म्हणून मुंडेंनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ,"अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.

संबंधित लेख